Tuesday, March 25, 2025

सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीची नवीन नियम येत्या १०-१२ दिवसांत प्रकाशित :...

2019 साली सहकार कायद्यात दुरुस्ती करुन पहिल्यांदाच एक नवीन चॅप्टर सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता सहकार कायद्यात समाविष्ट केला. सहकार कायद्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांची दखल घेतली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनची यासंदर्भातील नियम तयार करण्याची मागणी होती. ते नियम तयार करण्यात आले असून येत्या 10-12 दिवसांत ते प्रकाशित करु. तसेच सर्व सहकारी कार्यालये ऑनलाईन पद्धतीने जोडण्याची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ऑनलाईन करण्यात येण्यात येईल, तसेच येत्या सहा महिन्यात यासंदर्भातील नोंदणी, थकबाकी, वसुली, सुनावणी अशा सर्व सेवा व्हॉट्सअपवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

No comments:

Post a Comment