Tuesday, March 25, 2025

सहकारी गृहनिर्माण संस्थेसाठीची नवीन नियम येत्या १०-१२ दिवसांत प्रकाशित :...

2019 साली सहकार कायद्यात दुरुस्ती करुन पहिल्यांदाच एक नवीन चॅप्टर सहकारी गृहनिर्माण संस्थांकरता सहकार कायद्यात समाविष्ट केला. सहकार कायद्याने सहकारी गृहनिर्माण संस्थांची दखल घेतली. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या फेडरेशनची यासंदर्भातील नियम तयार करण्याची मागणी होती. ते नियम तयार करण्यात आले असून येत्या 10-12 दिवसांत ते प्रकाशित करु. तसेच सर्व सहकारी कार्यालये ऑनलाईन पद्धतीने जोडण्याची सुरुवात करण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ऑनलाईन करण्यात येण्यात येईल, तसेच येत्या सहा महिन्यात यासंदर्भातील नोंदणी, थकबाकी, वसुली, सुनावणी अशा सर्व सेवा व्हॉट्सअपवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thursday, March 6, 2025

मुंबई शहरातील इमारतींचा पुनर्विकास धोरण समंधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री...

 मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लागू करण्यात आलेले धोरण तीन महिन्यांत उपनगरांतील इमारती व चाळींच्या पुनर्विकासासाठी लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली

Tuesday, March 4, 2025

Sunday, March 2, 2025

मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास :: मुख्यमंत्री देवेंद्र...

''
स्वयं पुनर्विकासबरोबरच चाळी व झोपडपट्टी यांचा क्लस्टर पुनर्विकास हाती घ्यावा. त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. स्वयं पुनर्विकास व क्लस्टर पुनर्विकास यासाठी येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यासाठी आमदार प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार असून या समितीने सूचविलेल्या शिफारसी पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या गृहनिर्माण धोरणात समाविष्ट करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.