Monday, September 12, 2022

राज्य सहकारिता मंत्रियों का राष्ट्रीय सम्मेलन श्री अतुल सावे, सहकारिता म...

राज्य सहकारिता मंत्रियों का राष्ट्रीय सम्मेलन श्री अतुल सावे, सहकारिता मंत्री, महाराष्ट्र राज्य देशात सहकारामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट राज्यात एकूण २ लाख १७ हजार सहकारी संस्था आहेत, या सहकारी संस्थेशी एकूण साडेपाच करोड लोक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जोडलेले आहेत. महाराष्ट्राची आर्थिक प्रगतीमध्ये साखर कारखाना यांची भूमिका महत्वाची आहे. साखरेचे उत्पन्न मध्ये महाराष्टाचा नंबर ब्राजिल या देशादेशानंतर येतो. या २ लाख १७ हजार सहकारी संस्था मध्ये गृहनिर्माण संस्था एकूण १ लाख १५ हजार पेक्षा जास्त आहेत. झपाट्याने शहरी करणामुळे गृहनिर्माण संस्थाची संख्या वाढत आहे. नागरीसुविधा पुरविण्यामध्ये तसेच स्वच्छता अभियाना सफल करण्यामध्ये गृहनिर्माण संस्थाचे योगदान आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकार नीती बनवण्याची सुरवात केली आहे. केंद्राने प्रत्येक राज्यात सहकार विद्यापीठ स्थापन करणार आहे याची घोषणा केली आहे त्याचे सहकार मंत्री यांनी आभार मानले. इतर अनेक विषयावर त्यांनी माहिती दिली आहे

No comments:

Post a Comment