Wednesday, August 10, 2022

सहकारी संस्था यों में चुनाव प्रक्रिया के लिए अलग यंत्रणा : अमित शाह केंद...

सहकारी संस्था यों में चुनाव प्रक्रिया के लिए अलग यंत्रणा : अमित शाह केंद्रीय सहकारिता मंत्री सहकारी संस्थेत वर्षांनुवर्षे एकाच व्यक्तीने निवडून येणे गैर असून, या संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया अधिक खुली व पारदर्शक व्हायला हवी, असे नमूद करीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सहकारी संस्थांमध्ये अधिकाधिक सुधारणा राबविण्याची आग्रही भूमिका मांडली. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र निवडणूक यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय सहकारिता मंत्री अमित शाह म्हणाले केंद्रीय सहकार मंत्रालयाकडून या दिशेने नियम तयार केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले. सरकारच्या ई-मार्केटप्लेस (जेम) व्यासपीठावर देशभरातून ऑनलाइन धाटणीने सहकारी संस्थांना सामावून घेण्याच्या कार्यक्रमात बोलताना, सहकार हे देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत ‘उपेक्षित’ ठरलेले क्षेत्र असून, या क्षेत्राचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याची गरजही आहे असे अमित शाह यांनी प्रतिपादित केली. देशात सध्या ८.५ कोटी सहकारी संस्था असून, त्यांची एकूण सदस्यसंख्या २९ कोटींच्या घरात जाणारी आहे. या क्षेत्रात विकासाची प्रचंड क्षमता पाहता ही संख्या १०० कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे, असे शहा म्हणाले.

No comments:

Post a Comment