Wednesday, February 24, 2021

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुनश्च: ३१ मार्च २०२१ पर्यंत स्थगित

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 31 मार्चपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तशी माहिती सहकार विभागानं दिली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 क मधील तरतुदीनुसार राज्य सरकारला कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा अधिकार आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.(Government decides to postpone elections of co-operative societies in the state) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका वेळोवेळी 18 मार्च 2020, 17 जून 2020 आणि 28 सप्टेंबर 2020 रोजीच्या आदेशानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत, तर 16 जानेवारी 2021 रोजीच्या आदेशानुसार 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या.

No comments:

Post a Comment